मसला खुर्द प्रशालेमध्ये विद्यार्थ्यांना शुद्ध पाण्यासाठी जलशुद्धीकरण प्रकल्प कार्यान्वित

Advertisements
Ad 21

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मसला (खुर्द) येथे  जलशुद्धीकरण यंत्राचे लोकार्पण

तुळजापूर दि 11 प्रतिनिधी

11 एप्रिल 2023 रोजी महात्मा फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून ग्रामपंचायत मसला (खुर्द) च्या वतीने 15 व्या वित्त आयोगातून शाळेत विद्यार्थ्यांना पिण्याच्या शुद्ध पाण्याची व्यवस्था व्हावी म्हणून जलशुद्धीकरण यंत्र बसविण्यात आले आहे. या निमित्ताने मान्यवरांच्या शुभहस्ते महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती निमित्ताने त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली

या जलशुद्धीकरण यंत्राचे  लोकार्पण उपसरपंच श्रीराम खराडे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष लक्ष्मीकांत नरवडे, उपाध्यक्ष शिवाजी नरवडे,  ग्रामपंचायत सदस्य दयानंद शिंदे, लक्ष्मण वडवराव, विठ्ठल पोतदार, मुख्याध्यापक मारुती घंदूरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी रामभाऊ कोकरे,कालिदास जाधव,ज्योतिराम कांबळे व  सर्व शिक्षक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!