वडगाव (काटी)चे प्रगतशील द्राक्ष बागायतदार शाहीर नागनाथ चुंगे यांचे निधन

Advertisements
Ad 21

तुळजापूर(प्रतिनिधी) तुळजापूर तालुक्यातील काटी येथील प्रगतिशील द्राक्ष बागायतदार शाहिर नागनाथ चुंगे वय (63) यांचे रविवार दि. 19 रोजी सायंकाळी हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने दु:खद निधन झाले. वडगाव (काटी) परिसरात बऱ्याच वर्षांपासून ते प्रसिद्ध द्राक्ष बागायतदार म्हणून परिचित होते. त्यांच्या अचानक जाण्याने संपूर्ण गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

त्यांच्या पार्थिवावर सोमवारी सकाळी दहा वाजता त्यांच्या शेतामध्ये शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

त्यांच्या पश्चात पत्नी, पाच मुली, दोन मुले,सुना,भाऊ,बहिण, जावाई नातवंडे असा परिवार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!